पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे नोंद !

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही भाजपने संबंधित आदेशाचे पालन न करत आंदोलन केल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

धामणी (जिल्हा सातारा) येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे घर जळून खाक

पाटण तालुक्यातील धामणी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे डोंगरावर रहाणार्‍या एकनाथ बाबूराव नायकवाडी यांचे घर जळून खाक झाले आहे.

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’कडून पुण्यात पुरातत्व विभागाची झाडाझडती !

कृती समितीने उपस्थित केलेल्या अनेक सूत्रांवर साहाय्यक संचालकांनी ‘निधी नाही, मनुष्यबळ अपुरे आहे’, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पुराव्यांसह अतिक्रमणांविषयी माहिती दिल्यावर साहाय्यक संचालक निरूत्तर झाले.

अशा घटना कधी थांबणार ?

बदायू (उत्तरप्रदेश) येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे.

श्री. सत्यकाम कणगलेकर यांची ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेली वही आणि त्यांची ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणी’ यांतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेची परिणामकारकता वाढवण्यास आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्नही कसे साहाय्यभूत ठरतात, हे लेखातून लक्षात येते.

हिंदूंच्या धार्मिक गोष्टींविषयी निर्णय देतांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास व्हायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा होता. त्यामुळे त्यामध्ये  पालट केला. अशा प्रकारे घाईत ‘ऑर्डर’ का ‘पास’ केली जाते ? एक दिवस ‘ऑर्डर’  ‘पास’ करायची आणि याचिका प्रविष्ट झाली की, त्यात पुन्हा पालट करायचा’…

आजच्या शास्त्रज्ञांचा पोरखेळ !

‘ज्या ऋषिमुनींना ईश्‍वराचा शोध लावता आला, त्यांच्यासाठी हल्लीचे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ जे शोध लावतात, ते पोरखेळासारखे आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

आदर्श गुरुसेवेचा वस्तूपाठ म्हणजे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज !

संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासमवेत संपूर्ण जीवन सावलीसारखे राहून त्यांची अविश्रांत सेवा करणारे आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांची आज ७ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अलौकिक जीवनपट संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे शिकवून त्याची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन !

परात्पर गुरुदेवांच्या चरणी सातारा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन लेख स्वरुपात प्रस्तूत करत आहोत…