पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती

वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मार्चच्या रात्री त्यांना अटक केली. वाझे २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत आहेत.

केरळमध्ये ‘नमः शिवाय’ ऑनलाईन सामूहिक नामजप पार पडला भावपूर्ण वातावरणात !

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी, म्हणजेच ११ मार्च या दिवशी ‘नमः शिवाय’ हा सामूहिक नामजप हिंदी आणि मल्याळम् भाषेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या दोन्ही भाषांतील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 कोरोनाच्या संसर्गामुळे रात्री १० नंतर संचारबंदी असूनही पुण्यातील पब चालू !

पब चालू ठेवणारे, तसेच त्यावर अंकुश नसणारे कामचुकार आणि भ्रष्ट पोलीस दोघेही शिक्षेस पात्र आहेत. अशांवर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

सातारा नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे भ्रमणभाष देयक न भरल्यामुळे बंद !

सरकारी पदाचा गैरवापर करणारे आणि आपल्यामुळे सर्वांची हानी करणारे असे अधिकारी नकोच !

राज्यांतील निवडणुका होईपर्यंत मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला !  

तमिळनाडू आणि केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

नैराश्यामुळे बँक कर्मचार्‍याची खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या !

वडील, पत्नी आणि आई या तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाकमधील हिंदूंची हतबलता जाणा !

पाकमध्ये मागील वर्षी धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या प्राचीन मंदिराची आणि तिथे असलेल्या श्री परमहंसजी महाराज यांच्या समाधीची तोडफोड, तसेच जाळपोळही केली होती. या प्रकरणी आता येथील हिंदूंनी या जमावाला क्षमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहिवडी (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात आग 

दहिवडी येथील नगरपंचायत कार्यालयास आग लागली यात लाकडी सामान आणि धारिका, विद्युत् साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

ऑनलाईन ‘मंदिर – संस्कृती रक्षा राष्ट्रीय अधिवेशना’ला विविध मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांपैकी ‘मंदिर सरकारीकरण’ हा एक ज्वलंत आणि प्रमुख आघात आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून ताजमहालचे नाव पालटून ‘राममहाल’ केले जाईल ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा दावा

सुरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले आहे. सिंह म्हणाले की, महाराजांचे वंशज उत्तरप्रदेशच्या भूमीत आले आहेत.