दहिवडी (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात आग 

सातारा, १५ मार्च (वार्ता.) – दहिवडी येथील नगरपंचायत कार्यालयास १४ मार्च या दिवशी सकाळी अचानक आग लागली. यामध्ये कार्यालयातील लाकडी सामान आणि धारिका, विद्युत् साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या वेळी नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

१४ मार्च या दिवशी सकाळी ९.३० वाजता नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीमधून धूर येतांना स्थानिकांना आढळून आले. ग्रामस्थांनी ही गोष्ट नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना कळवली. नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. दीड घंडा परिश्रम घेतल्यानंतर आग आटोक्यात आली.