(म्हणे) ‘मत दिले नाही, तर पाणी आणि वीज मिळणार नाही !’  

बंगालमधील मंत्री अशा प्रकारची धमकी देतात, याचा अर्थ तेथे तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही आहे ! याविरोधात लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते असणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पक्ष, संघटना, बुद्धीवादी तोंड उघडत नाहीत !

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून जनतेला त्रास झाल्यास खपवून घेणार नाही ! – आमदार वैभव नाईक

शासनस्तरावर प्रतिवर्षी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी केले जाणारे प्रयत्न किती तकलादू आहेत, हे लक्षात येते, तसेच प्रतिवर्षी शासकीय कार्यालयातून दिली जाणारी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयीची शपथ, हाही एक ‘फार्स’ असल्याचे स्पष्ट होते !

कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर द्या !

कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने गोव्यासह एकूण ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर देण्याचा आदेश दिला आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पसार झाल्याचा संशय असलेले बंदीवान कारागृह परिसरातच सापडले

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून ५ मार्च या दिवशी सायंकाळी पलायन केल्याचा संशय असलेले दोघे कैदी (बंदीवान) उपेंद्र नाईक आणि हुसेन कोयडे या दोघांना ५ मार्चला मध्यरात्री ३.३०च्या सुमारास कह्यात घेण्यात आले.

कोकणातील युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेती ही शाश्‍वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकर्‍यांनी केवळ दोन घास दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मानसिक तणावातून पोलिसांच्या वाढत्या आत्महत्या !

कामाचा ताण, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडून छळवणूक, आरोग्यविषयक समस्या किंवा मानसिक तणाव आदींमुळे टोकाची भूमिका घेऊन गोव्यात काही पोलीस कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

कोटीशः प्रणाम !

• सनातनच्या ७७ व्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी यांची आज पुण्यतिथी
• छत्तीसगड येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंह इंगळे यांचा आज वाढदिवस
• सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर यांचा आज वाढदिवस

बेळगाव येथील १६ मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या आदेशाला तूर्तास स्थगिती !

जिल्ह्यातील १६ मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेत धर्मादाय आयुक्तांनी त्या मंदिरांना नोटिसा पाठवल्या होत्या. या अन्यायकारक आदेशाला धर्मादाय आयुक्त मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यास सांगितले आहे.