केंद्राचा गोव्यासह एकूण ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना आदेश
पणजी – कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने गोव्यासह एकूण ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर देण्याचा आदेश दिला आहे.
गोव्यासह देहली येथील ९ जिल्हे, हरियाणा येथील १५ जिल्हे, आंध्रप्रदेश येथील १० जिल्हे, ओडिसा येथील १० जिल्हे, हिमाचल प्रदेश येथील ९ जिल्हे, उत्तराखंड येथील ७ जिल्हे आणि चंदीगढ येथील एक जिल्हा यांमध्ये एकूण कोरोनासंबंधी चाचण्या आणि आठवड्याभरात कोरोनाबाधित रुग्ण यांमध्ये वाढ झाल्याने अन् कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यामध्ये घट झाल्याने चिंता व्यक्त केली आहे. या सर्व जिल्ह्यांनी एकूण कोरोनासंबंधी चाचण्या वाढवणे, कोरोनाबाधित रुग्ण अधिक प्रमाणात असलेला भाग ‘कंटेनमेंट झोन’ घोषित करणे आदी उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे.