संशयिताकडून पोलीस निरीक्षकांसमोरच तक्रारदारावर चाकूने आक्रमण

पोलीस ठाण्यात येऊन संशयित आरोपी तक्रारदारावर येऊन चाकूने आक्रमण करतो म्हणजे पोलिसांचा धाक पोलीस ठाण्यातही राहिला नसल्याचे लक्षण आहे. असे पोलीस त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांचे रक्षण काय करणार ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यासाठी मंगळवेढा येथे नागरिकांची स्वाक्षरी मोहीम !

महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे लज्जास्पद !

महाशिवरात्रीनिमित्त लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर आणि श्री रत्नेश्‍वर देवस्थान यांची यात्रा रहित

१ मार्च या दिवशी देवस्थानचे प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त यु.एस्. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही ! – हर्षल सुर्वे, शिवदुर्ग संवर्धन आंदोलन

इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही, अशी चेतावणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली

सातारा तहसील आणि प्रांत कार्यालय यांसाठी नवीन इमारत प्रस्ताव संमत करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्या ! – उदयनराजे भोसले

तहसील आणि प्रांत कार्यालय यांसाठी नवीन इमारत उभारणी आवश्यक आहे. त्याविषयी शासनाकडे दिलेला प्रस्ताव तात्काळ संमत करण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

विनाकारण वाहने अडवणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल ! – तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतलेला निर्णय योग्य असून असा निर्णय अन्य पोलीस अधिकार्‍यांनीही घ्यावा.

‘सारथी’ बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच उत्तरदायी ! – नरेंद्र पाटील

पाटण (जिल्हा सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळकोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. तेव्हा ते बोलत होते.

‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचा लाळघोटेपणा म्हणा अथवा लांगूलचालन म्हणा, या सर्वांचे दुसरे नाव म्हणजेच ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होय. काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १३५ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आरंभीची काही वर्षे सोडली, तर काँग्रेसचा हाच एककलमी कार्यक्रम राहिलेला आहे

श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !

श्रीराममंदिराचे बांधकाम चालू आहे. येथे आता ७० नाही, तर १०७ एकरमध्ये हे मंदिर आणि त्याचा परिसर असणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्र्स्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’ने सखोल अन्वेषण करावे !

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यभर निवेदन देण्यात आले.