इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही ! – हर्षल सुर्वे, शिवदुर्ग संवर्धन आंदोलन

कोल्हापूर – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार जोपर्यंत भारतात परत येणार नाही, तोपर्यंत इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही, अशी चेतावणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. या वेळी प्रदीप हांडे म्हणाले, ‘‘ही तलवार या देशाची अस्मिता आहे. त्यामुळे ती परत आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना शिवभक्तांनी लाखो पत्रे पाठवावीत.’’