भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि गोव्यात : म्हादईवर भाष्य करण्यास नकार

गोवा शासनाने म्हादई प्रश्‍नी कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांवर उपचार करतांना लुटमार ! – संसदीय समिती

अशा प्रकारे रुग्णांची लुटमार करणार्‍या रुग्णालयांवर केंद्र सरकारने कारवाई करून संबंधित रुग्णांना आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यासाठी या रुग्णालयातील उत्तरदायींना बाध्य केले पाहिजे !

गोव्यात शासकीय कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक ! – ‘सीआयआय’ अहवाल

सत्तेवर आल्यावर काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील युवकांना रोजगार दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे, असे म्हटल्यास गैर नाही ! जनतेमध्येही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड चालू असते. त्यासाठी आर्थिक व्यवहारही होतात !

उत्तराखंडमधील भाजप सरकार आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून आता ५० सहस्र रुपये देणार

देशात एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना अशा प्रकारची योजना राबवणे हा हिंदुद्रोहच ! अशा प्रकारच्या विवाहामुळे किती प्रमाणात राष्ट्रीय एकता वाढली आणि किती प्रमाणात हिंदु तरुणींवर अन्याय झाला, हे सरकारने घोषित करावे !

‘नेटफ्लिक्स’वरील ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन

प्रतिदिन नवनवीन वेब सिरीजमधून हिंदूंचा अवमान केला जात असतांना केंद्र सरकारने अशांवर बंदी घालण्यासाठी जलद प्रयत्न करणे आवश्यक ! असे प्रसंग अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या परिसरात दाखवण्याचे धाडस कधी केले जाते का ?

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील आश्रमातील २ साधूंचा संशयास्पदरित्या मृत्यू, तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक

भाजपचे राज्य असणार्‍या उत्तरप्रदेशमध्ये सातत्याने साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

आयुर्वेदीय वैद्यांना नाक, कान, गळा, डोळे, दात आणि हाडे यांच्यावर शस्त्रकर्म करण्याची केंद्र सरकारची अनुमती

केंद्र सरकारने आयुर्वेदीय वैद्यांना आता शस्त्रकर्म करण्याची अनुमती दिली आहे. आयुर्वेदातील पदव्युत्तर विद्यार्थी हे शस्त्रकर्म करू शकणार आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा प्रखर विरोध केला आहे.

सगळे उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सगळे उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका, अनावश्यक घराबाहेर पडू नका, कोरोनाची लक्षण दिसली तर लगेचच चाचणी करा, आपण सर्व सण संयमाने साजरे केले आता कार्तिकी यात्रेला गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

कर्नाटक सरकार ऑनलाईन खेळांवर बंदी घालणार

इंटरनेटवर ऑनलाईन खेळावर राज्यात लवकरच बंदी घालण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. काँग्रेसचे नेते दिनेश गुंडुराव यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.