उत्तराखंडमधील भाजप सरकार आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून आता ५० सहस्र रुपये देणार

राष्ट्रीय एकता निर्माण करण्याचा उद्देश

  • देशात एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना अशा प्रकारची योजना राबवणे हा हिंदुद्रोहच होय !
  • हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांत भाजप सरकारने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची घोषण केली आहे, तर ‘बंगाल आणि महाराष्ट्र येथे सत्तेत आल्यास हा कायदा करू’, असे भाजपने घोषित केलेले असतांना उत्तराखंडमधील भाजप सरकारने अशी योजना चालू ठेवून त्यामध्ये रकमेची वाढ करणे आश्‍चर्यजनकच आहे. भाजपकडून अशी योजना चालवली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !

देहरादून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकार अन्य धर्मामध्ये किंवा जातीमध्ये विवाह करणार्‍या दांपत्याला आता ५० सहस्र रुपये प्रोत्साहन स्वरूपात देणार आहे. ही योजना पूर्वीपासून लागू असून पूर्वी त्यासाठी १० सहस्र रुपये देण्यात येत होते. या योजनेनुसार पैसे मिळवण्यासाठी दांपत्यांना विवाहाची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्याची माहिती राज्याच्या समाज कल्याण विभागाला देणे बंधनकारक असणार आहे. तसेच विवाहाच्या एक वर्षाच्या आता या रकमेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

 (सौजन्य : NMF News)

१. आंतरजातीतील विवाह करणार्‍यांना असणार्‍या अटीमध्ये कलम ३४१ नुसार प्रमाणित करण्यात आलेल्या जातींपैकी हे दांपत्य असणे आवश्यक आहेत.

२. टेहरीचे सामाजिक कल्याण अधिकारी दीपांकर घिडियाल यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या योजना राष्ट्रीय एकता वाढवणार्‍या सिद्ध होऊ शकतात. (आतापर्यंत अशा प्रकारच्या विवाहामुळे किती प्रमाणात राष्ट्रीय एकता वाढली आणि किती प्रमाणात हिंदु तरुणींवर अन्याय झाला, याची आकडेवारी प्रशासनाने घोषित करणे आवश्यक आहे ! – संपादक)