भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि गोव्यात : म्हादईवर भाष्य करण्यास नकार

सी.टी. रवि

पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि गोवा प्रभारी सी.टी. रवि २२ नोव्हेंबर या दिवशी गोव्यात आले आहे. पक्षाचे प्रभारी पद स्वीकारल्यानंतर त्यांची गोव्यातील ही पहिलीच भेट आहे. गोव्यात आल्यावर पत्रकारांनी म्हादईसंबंधी त्यांची भूमिका विचारल्यावर उत्तर देण्यास सी.टी. रवि यांनी नकार दर्शवला.

 (सौजन्य : ingoanews)

भाजपच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर याविषयी मत व्यक्त करणार असल्याचे ते पुढे म्हणाले. सी.टी. रवि हे कर्नाटकातील आहेत आणि गोवा शासनाने म्हादई प्रश्‍नी कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.