शहरात मोकाट गुरे सोडल्‍यास संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करणार ! – अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा नगरपालिका

पाळीव गुरांच्‍या मालकांनी शहरामध्‍ये मोकाट गुरे सोडल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मीरारोड (जिल्‍हा पालघर) येथे पोलिसावर आक्रमण करून आरोपीचे पलायन !

सामान्‍य आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस कुख्‍यात गुंडांना कसे सामोरे जाणार ?

ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘आचार्य अत्रे’ पुरस्‍कार घोषित !

मुंबई मराठी पत्रकार संघाच्‍या पुरस्‍कार समितीची बैठक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष नरेंद्र वाबळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. त्‍यात सर्वानुमते वैद्य यांना हा पुरस्‍कार देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

मुंबई येथील नूर धर्मादाय रुग्णालयातील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला ! – सौ. यामिनी जाधव, आमदार, शिवसेना

रुग्णांकडे दुर्लक्ष करणार्‍या खासगी, धर्मादाय किंवा कोणत्याही रुग्णालयांवर लोकप्रतिनिधींचा वचक असला पाहिजे, तरच लोकप्रतिनिधी याविषयी आवाज उठवतात, असा पायंडा पडेल. चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी ही लक्षवेधी मांडून आवाज उठवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार सौ. यामिनी जाधव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.

सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी हिंदु महिलेवर रात्रभर केला सामूहिक बलात्कार !

बांगलादेशमधील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच हिंदूंवर अत्याचार करत असतांना भारत सरकार हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र बांगलादेश सरकारकडे उपस्थित का करत नाही ?

ज्‍येष्‍ठ शिवसैनिक विजय गावकर यांचे निधन

शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवक विजय गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्‍यांच्‍या पार्थिवावर भोईवाडा स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. या वेळी परळ, शिवडी, लालबाग भागातील अनेक ज्‍येष्‍ठ शिवसैनिक उपस्‍थित होते.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील बसस्थानकाची लवकरच ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर पुनर्बांधणी ! – प्रकाश आवाडे, आमदार

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पुनर्बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार

औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे. 

उत्तराखंडमधील मुसलमानांच्या अवैध झोपडपट्टीद्वारे नदीमध्ये प्रदूषण !

अवैध झोपडपट्टी होईपर्यंत आणि तेथून नदीचे प्रदूषण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

अतिक्रमणांच्या विरोधात व्यापक जागरण आणि कायदेशीर लढा यांची आवश्यकता ! – उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

माहीम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे.