मुंबई – देहलीहून मुंबईत महागड्या विदेशी मद्यांची तस्करी करणारा सतीश शिवलाल पटेल (वय ३५ वर्षे) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कह्यात घेतले. त्याची चारचाकी आणि घर येथून विदेशी मद्याच्या २०५ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या बाटल्यांचे मूल्य १४ लाखांहून अधिक आहे. गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत करण्यात आली आहे. ‘महंमद नावाचा माणूस मद्य मुंबईत आणतो. ते माझ्याकडे देतो’, अशी माहिती सतीशने दिली. पोलीस महंमदचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिका :मद्य, अमली पदार्थ यांची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी अजून कठोर पावले उचलायला हवीत ! |