मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे मासांमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे गृहमंत्री योगी आदित्यनाथ हेही या सभांना उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती भाजपने दिली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.