पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे २१० गुरांची कातडी, तर वैजापूर येथे गोवंशियांचे २ टन मांस पोलिसांनी पकडले !

पैठण येथील कुरेशी मोहल्ला, तर भारतनगर येथे धाडी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

छत्रपती संभाजीनगर – शहरात शिवराईकडे जाणार्‍या भारतनगर वसाहतीत बंदी असतांनाही गोवंशियांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणार्‍या संशयिताला पोलिसांनी पकडले, तसेच २ टन गोमांस आणि वाहतूक करणारे वाहन असा ७ लाख रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी आरोपी इमरान उस्मान कुरेशी आणि अहमद कुरेशी या दोघांवर महाराष्ट्र प्राणीरक्षण (सुधारणा) कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथेही पोलिसांनी २१० गुरांची कातडी पकडली आहे. (गोवंशियांची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ? – संपादक)

वैजापूर-शिवराई रस्त्यावरील भारतनगर येथे मशिदीच्या पाठीमागील गल्लीत अहमद कुरेशी यांच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी अचानक धाड घातली. गोवंशियांचे अंदाजे २ टन मांस, ४ लाख रुपयांचे चारचाकी वाहन सापडले. तक्रारदार पोलीस कर्मचारी रंजित चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपी इमरान उस्मान कुरेशी, अहमद कुरेशी इत्यादी ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

पैठण शहरातील कुरेशी मोहल्ला नेहरू चौक येथे १९ एप्रिलच्या पहाटे पशूवधगृहावर धाड घातली. या वेळी पोलिसांनी गोमांसासह २१० गुरांची कातडी जप्त केली. संभाजीनगर येथील पथकाने ही कारवाई केली. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, संशयित समद फकिर कुरेशी, अब्दुल सलाम अब्बास कुरेशी, जानी खैरुचीन कुरेशी आणि इतर तिघे यांनी गोवंशीय अन् इतर जनावरे यांची कत्तल करण्याचा परवाना नसतांना ते गुरांची कत्तल करतांना आढळून आले.

यापूर्वी गोवंशियांची कत्तल करून त्यांची विल्हेवाट लावून पुरावा त्यांनी नष्ट केला. कत्तल केलेल्या गोवंश जातीच्या २१० जनावरांची कातडी एका पत्र्याच्या शेडमध्ये आढळली. या प्रकरणी वरील आरोपींवर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘आगामी काळातही परिसरातील अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल’, असे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितले. (बोलण्याऐवजी पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली असती, तर आज असे प्रकार घडले नसते. – संपादक)