उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करून बढती मिळवणार्‍या ४ अधिकार्‍यांची थेट चौकीदार, कारकून आदी पदांवर नियुक्ती !

अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्‍वती देता येणार नाही !

हुबळी मार्गे जाणार्‍या १९ रेल्वे गाड्या रहित

नैऋत्य रेल्वे विभागातील असणार्‍या हुबळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने वेगवेगळ्या दिवशी एकूण १९ रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे.

उच्च शिक्षण विभागाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठास नोटीस

महाराष्ट्र शासनाची अनुमती न घेता विद्यापिठाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ११ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याने उच्च शिक्षण विभागाने विद्यापिठास फटकारले आहे.

भिवंडी येथील खासगी जागेवरील अतिक्रमण हटवले

अतिक्रमण आणि कचर्‍याची दुर्गंधी यांमुळे शिवाजीनगर भागातील नागरिक त्रस्त झाले होते. नगरसेविका सौ. सायली गजानन शेटे यांच्या पुढाकाराने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने येथील खासगी जागेवरील अतिक्रमण आणि कचरा हटवण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि  लडाख भारतापासून वेगळे !

लंडनधील भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही गोष्ट सर्वप्रथम आली. ‘यामागे चीनचा हात असू शकेल; कारण चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले जाते’, असा दावा पंकज यांनी केला आहे.

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये ३०० जिहादी आतंकवादी ठार !

पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित करणारे आता बोलतील का ?

भंडारा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

‘‘या वेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती चौकशी करत आहे. एका मासात या समितीचा अहवाल येईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’’

देहली येथे मशिदीमध्ये अल्पवयीन मुलांकडून १० वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या

हत्या मशिदीत घडली असल्याने ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमे शांत आहेत, हे लक्षात घ्या ! तसेच धर्मांधांमध्ये बालपणापासून गुन्हेगारी वृत्ती असते, हेही यातून स्पष्ट होते !

भारतात प्रसारित होणार्‍या हिंदी चित्रपटांमध्ये उर्दू आणि इंग्रजी मिश्रित हिंदीचा वापर !

हिंदी चित्रपटांद्वारे हिंदीवर उर्दू आणि इंग्रजी भाषांचे होणारे आक्रमण गंभीर आहे. याचा प्रभाव समाजावर होतो ! त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी हिंदीच्या शुद्धीसाठी शालेय स्तरावरून, तसेच मनोरंजन आदी क्षेत्रांतूनही प्रयत्न केले पाहिजेत !