|
छत्रपती संभाजीनगर – सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील एका ठिकाणी व्याख्यानात बांगलादेशी हिंदूंवर तेथील मुसलमानांकडून कशा प्रकारे अत्याचार केले जातात ? याविषयी वक्ते माहिती देत होते. या वेळी एका अन्य धर्मीय महिलेने याला आक्षेप घेतल्यामुळे उपस्थित हिंदु महिलांनी सत्तार यांनी दिलेल्या साड्यांची रस्त्यावर येऊन होळी केली. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे ५ ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली आहे.
सिल्लोड येथील कार्यक्रमात बांगलादेशी हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी माहिती दिली जात असतांना एका धर्मांध महिलेने ‘आमच्या समाजाची अपकीर्ती थांबवा’, असे सांगत ही माहिती सांगण्याला विरोध केला. तेव्हा उपस्थित हिंदु महिलांनी तिला असे करण्यापासून रोखल्यावर तिने ‘अब्दुल सत्तार यांच्या साड्या तुम्हाला कशा चालतात ?’, असा प्रश्न विचारला (यातून हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांधांची मानसिकता सर्वत्र सारखीच असते, हे लक्षात येते. यातून अशा धर्मांधांशी व्यवहार करायचा का ? हेसुद्धा हिंदूंना ठरवावे लागणार आहे. – संपादक) तेव्हा उपस्थित हिंदु महिलांनी धर्माभिमान दाखवत कार्यक्रमातून बाहेर येऊन रस्त्यावरच साड्यांना आग लावून त्यांची होळी केली. या घटनेविषयी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अन् नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने महिलांना साड्यांचे वाटप केले होते; मात्र वरील प्रकारानंतर संतप्त महिला आणि ग्रामस्थ यांनी या साड्यांची रस्त्यावरच होळी केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला असून काही महिला साड्यांची होळी करतांना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. |
संपादकीय भूमिकाहिंदूंवरील अत्याचारांची माहिती देण्यास रोखणार्यांना योग्य प्रत्युत्तर देणार्या हिंदु महिलांचे अभिनंदन ! हिंदूंनी असाच बाणेदारपणा, एकजूट प्रत्येक ठिकाणी दाखवल्यास हिंदूंकडे कुणी वाकड्या दृष्टीने पाहू शकणार नाही. |