नाशिक – येथील त्र्यंबकेश्वरमधून १० मुसलमान तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले. ब्रह्मगिरी पर्वत परिसरात हे तरुण भ्रमणभाषद्वारे परिसराचे चित्रीकरण करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा मुसलमानांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली; म्हणून नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. हे तरुण केरळमधील असल्याचे समजते. त्यांना चौकशीसाठी त्र्यंबकेश्वरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांच्याकडील कागदपत्रे आणि भ्रमणभाषमध्ये काढलेली छायाचित्रे यांची पडताळणी केली जात आहे.
संपादकीय भूमिकाकेरळमधील मुसलमान हिंदूंच्या तीर्थक्षेत्री काय करत होते ?, याची चौकशी करून सत्य समोर यायला हवे ! |