साहाय्य करणार्या नगरसेविका सौ. सायली शेटे यांचे सह्याद्री पतसंस्थेने मानले आभार
ठाणे – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजीनगर भागातील पटेल शॉपिंग प्लाझा परिसरातील अतिक्रमण आणि कचर्याची दुर्गंधी यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. सह्याद्री पतसंस्थेच्या वतीने यावर कारवाई होण्यासाठी स्थानिक नगरसेविका सौ. सायली गजानन शेटे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. याची नोंद घेत ९ जानेवारी या दिवशी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने येथील खासगी जागेवरील अतिक्रमण आणि कचरा हटवण्यात आला. यानंतर ‘कुणीही अतिक्रमण करू नये, तसेच कचरा किंवा घाण टाकू नये’, अशी समज सर्व हातगाडी लावणार्या व्यावसायिकांना देण्यात आली. या वेळी सह्याद्री पतसंस्थेच्या शाखाधिकारी सौ. संगीता किशोर पाटील आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या या अतिक्रमणावर योग्य ती कार्यवाही केल्याविषयी नगरसेविका सौ. सायली शेटे यांचे सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वास थळे आणि सचिव श्री. प्रमोद पाटील यांनी आभार व्यक्त केले.