हुबळी मार्गे जाणार्‍या १९ रेल्वे गाड्या रहित

बेळगाव – नैऋत्य रेल्वे विभागातील असणार्‍या हुबळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने वेगवेगळ्या दिवशी एकूण १९ रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. हुबळी रेल्वेच्या नवीन ट्रॅकचेही बांधकाम करण्यात येत आहे. हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (क्रमांक – ७३१७) ही गाडी २० ते २८ जानेवारी, तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस- हुबळी ही गाडीही २१ ते २९ जानेवारीपर्यंत, निजामुद्दीन-यशवंतपूर २२ ते २७ जानेवारीपर्यंत, २३ ते २८ जानेवारीपर्यंत यशवंतपूर-वास्को-यशवंतपूर, तर यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस २६ ते २८ जानेवारीपर्यंत रहित करण्यात आली आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन हुबळी रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.