जागतिक आरोग्य संघटनेच्या मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि  लडाख भारतापासून वेगळे !

चीनचा हात असण्याचा संशय

जागतिक आरोग्य संघटनेच्या या भारतद्वेषी कृत्यासाठी भारत सरकारने कठोरपणे जाब विचारून त्याला धडा शिकवणे अपेक्षित आहे !

नवी देहली –  जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या एका मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि लडाख हे २ भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहेत. हे रंगीत मानचित्र या संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यात भारतीय भूभाग गडद निळ्या रंगात, तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला आहे.

(डब्ल्यूएचओ’ने असा विकृत भारतीय नकाशा प्रसारित केलेला आहे – स्रोत WHO)

जागतिक स्तरावर कोणत्या देशात कोरोनाचे किती रुग्ण आढळून आले आहेत आणि कोरोनामुळे कोणत्या देशात किती मृत्यू झाले आहेत, याची माहिती या मानचित्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ‘संयुक्त राष्ट्रांच्या  मार्गदर्शक तत्त्वांचे पालन संघटनेकडून केले जाते आणि त्याप्रमाणेच मानचित्र पाहिला, समजला आणि दाखवला जातो’, असे स्पष्टीकरण या संघटनेकडून देण्यात आले आहे. (जर संयुक्त राष्ट्रांकडून अशा प्रकारचे मानचित्र प्रकाशित करण्यात आले असेल, तर भारताने संयुक्त राष्ट्रांना खडसावले पाहिजे आणि त्यात पालट करण्यास बाध्य केले पाहिजे ! – संपादक)

लंडनधील प्रवासी भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही गोष्ट सर्वप्रथम आली. ‘यामागे चीनचा हात असू शकेल; कारण चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले जाते’, असा दावा पंकज यांच्याकडून करण्यात आला आहे.


(सौजन्य : Republic World)