देहली येथे मशिदीमध्ये अल्पवयीन मुलांकडून १० वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या

  • हत्या मशिदीत घडली असल्याने ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमे शांत आहेत, हे लक्षात घ्या !
  • धर्मांधांमध्ये बालपणापासून गुन्हेगारी वृत्ती असते, हेही यातून स्पष्ट होते !

नवी देहली – येथील एका मशिदीमध्ये १० वर्षांच्या मुलाची त्याच्या सहकारी मुलांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी १२ आणि १७ वर्षांच्या दोघा अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. हा मुलगा मशिदीमध्ये शिकण्यासाठी गेला असता तो परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्या वेळी त्याचा मृतदेह मशिदीच्या छतावर सापडला.

या मुलाचे अपहरण करून त्याच्या पालकांकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करतांना त्याच्या दोघा अल्पवयीन सहकार्‍यांनी गळा दाबून त्याची हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे. ‘याचा कट आम्ही १० दिवसांपूर्वी रचला होता’, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी काही दिवसांपूर्वी या मुलाला झोपेच्या गोळ्या देऊनही ठार करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो अयशस्वी ठरला होता.