सीबीआय चौकशीसाठी राज्यांची अनुमती घेणे आवश्यक !  – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) चौकशीसाठी संबंधित राज्याकडून अनुमती घेणे बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे.

फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्री अन् त्याच्या पत्नीला अटक

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

संयुक्त अरब अमिरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इतर ११ देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे.

‘मुकुठी अम्मान’ या तमिळ चित्रपटात हिंदु धर्म, देवता आदींचे विडंबन

तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदु देवता, गुरु आणि परंपरा यांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन करण्यात आले होते, तर ‘मुकुठी अम्मान’ या चित्रपटातही असेच विडंबन काही प्रमाणात करण्यात आले आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

खोटारडेपणा उघड झाल्यावर २५ लाख रुपयांची मागणी : हिंदु तरुणींशी प्रेम करण्यासाठी मुसलमान तरुणांना धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ?

लडाख चीनचा भूभाग असल्याचा नकाशा दाखवणार्‍या ट्विटरची क्षमायाचना

ट्विटरने त्याच्या मानचित्रामध्ये लडाखला चीनचा भूभाग दाखवला होता. या प्रकरणी भारताच्या संसदीय समितीने नोटीस बजावून क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने समितीसमोर लेखी क्षमायाचना केली आहे.

देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.

बेळगाव ते रायगड सायकलवर प्रवास करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी किल्ला रायगडावर साजरा केला दीपोत्सव

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी बेळगाव ते रायगड किल्ला असा सायकल प्रवास करून रायगडावर दीपोत्सव साजरा केला.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे बनावट नोटाप्रकरणी एकास अटक

२ युवक चारचाकी वाहनामध्ये बसून दोनशे आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होते.

राज्यातील शाळा चालू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना

शाळांना सॅनिटायझर, थर्मलगन, ऑक्सिमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे