‘मुकुठी अम्मान’ या तमिळ चित्रपटात हिंदु धर्म, देवता आदींचे विडंबन

केंद्र सरकारने हिंदूंच्या देवतांचा अनादर करणार्‍या अशा माध्यमांना रोखण्यासाठी आणि संबंधितांना कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

चेन्नई – तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदु देवता, गुरु आणि परंपरा यांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन करण्यात आले होते, तर ‘मुकुठी अम्मान’ या चित्रपटातही असेच विडंबन काही प्रमाणात करण्यात आले आहे. या विडंबनामुळे हिंदूंमध्ये संताप निर्माण झाला आहे. या चित्रपटात ख्रिस्ती धर्माशी संबंधित एक दृश्य होते; मात्र ते वगळण्यात आले आहे. तसेच नायकाची भगिनी ख्रिस्ती धर्म स्वीकारते, असे दाखवून धर्मांतराला प्रोत्साहन दिले आहे. या चित्रपटाविरुद्ध आंदोलन करण्याची आवश्यकता अनेक हिंदूंनी प्रतिपादित केली.