बेळगाव – हालगा, धामणे, मच्छे, वाघवडे या ४ गावांतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी बेळगाव ते रायगड किल्ला असा सायकल प्रवास करून रायगडावर दीपोत्सव साजरा केला. या वेळी ३२ मण सोन्याचे सिंहासन पूर्ण होण्यासाठी शिवछत्रपतींच्या चरणी साकडे घालण्यात आले. हे सर्व धारकरी १३ नोव्हेंबर या दिवशी रात्री ११ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक (बोगारवेस, बेळगाव) येथून निघाले. कोल्हापूर, कराड, सातारा असे टप्पे पार करत ते १६ नोव्हेंबर या दिवशी हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज श्री किल्ले रायगड येथे पोहोचले.
या उपक्रमात सर्वश्री सचिन चोपडे, रोहित येळ्ळूरकर, महेश मोरे, किशोर लाड, हरीश पाटील, बबितेश सुळगेकर, रवी मिसाळे, रोहन कनबरकर, नागराज लाड, अमोल बेळगुंदकर, अमित कनबरकर, प्रवीण पाटील सहभागी झाले होते.