‘आंचिम’च्या उद्घाटनासाठी केवळ ३०० जणांना प्रवेश मिळणार

राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून ‘हायब्रीड’ पद्धतीने चालू होणार असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ३०० हून अल्प जणांना उपस्थित रहाता येणार आहे.

चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नये ! – नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

नेपाळमध्ये संसद विसर्जित करण्यात आल्याने पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि त्यात विजयी होण्यासाठी ओली यांना भारताचे कौतुक अन् चीनवर टीका करून मते मिळवायची आहेत, त्याच अनुषंगाने ते अशी विधाने करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !

ट्रम्प यांच्या आता यू ट्यूब चॅनलवरही बंदी

ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ ‘हिंसेला प्रोत्साहन देत आहेत’, असे कारण देत यू ट्यूबने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली आहे.

वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा

प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !

तुर्कस्तानमधील १ सहस्र प्रेयसी असणार्‍या मुसलमान धर्मगुरूला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी १ सहस्र ७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

ख्रिस्त्यांच्या वासनांध पाद्रयांच्याही कितीतरी पाऊल पुढे असलेले धर्मांध धर्मगुरु ! हिंदूं संतांची नाहक अपकीर्ती करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंट बंद

अमेरिकी अ‍ॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्‍या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी

जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्‍या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’ मध्ये १२ चित्रपट प्रदर्शित होणार

या चित्रपटांमध्ये ‘नाईट ऑफ द किंग्स्’, ‘लव्ह अफेअर्स’ आणि ‘द बिग हिट’ हे फ्रान्समधील चित्रपट दाखवण्यात येतील.  जगभरातील चित्रपटांमधून उत्कृष्ट आणि निवडक असे चित्रपट ‘कॅलिडोस्कोप’ या विभागात दाखवण्यात येतात.

जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाची चिनी कोरोना लसीला मान्यता

‘चिनी कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश आहे’, असे सांगत त्याला विरोध करणार्‍या इस्लामी राष्ट्र इंडोनेशियाला जशी ‘यात डुकराचा अंश नाही’, अशी  जाणीव झाली, तशी भारतातील लसीला विरोध करणार्‍या मुसलमानांना कधी होणार ?

जगातील ९ देशांकडून भारताकडे स्वदेशी कोरोना लसीची मागणी !

भारताने कोरोनावरील स्वदेशी लसीची निर्मिती केली असून त्याच्या आपत्कालीन वापराला अनुमती दिली आहे. यानंतर जगातील ९ देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.