‘आंचिम’च्या उद्घाटनासाठी केवळ ३०० जणांना प्रवेश मिळणार

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर संख्येवर मर्यादा

पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून ‘हायब्रीड’ पद्धतीने चालू होणार असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ३०० हून अल्प जणांना उपस्थित रहाता येणार आहे. अतिथी आणि महनीय व्यक्ती वगळता जेमतेम १०० जणांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे बहुसंख्यांकांना ‘ऑनलाईन’ वा दूरचित्रवाणीद्वारेच उद्घाटन समारंभाचा लाभ घ्यावा लागणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शन तत्त्वांमुळे २०० हून अधिक चित्रपट रसिकांना प्रवेश देणे शक्य होणार नाही, अशी माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. ‘आंचिम’ची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. महोत्सवासाठी नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कला अकादमी आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्यासमोर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे