ट्रम्प यांच्या आता यू ट्यूब चॅनलवरही बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – गूगलच्या मालकीच्या यू ट्यूबने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ ‘हिंसेला प्रोत्साहन देत आहेत’, असे कारण देत यू ट्यूबने ही कारवाई केली. ‘ट्रम्प यांना या चॅनेलवरून किमान ७ दिवस नवीन व्हिडिओ अपलोड करता येणार नाही’, असेही गूगलने स्पष्ट केले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबूक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले.