प्रमुख इस्लामी संघटनेकडून लस ‘हलाल’ असल्याचे सांगत मान्यता
‘चिनी कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश आहे’, असे सांगत त्याला विरोध करणार्या इस्लामी राष्ट्र इंडोनेशियाला जशी ‘यात डुकराचा अंश नाही’, अशी जाणीव झाली, तशी भारतातील लसीला विरोध करणार्या मुसलमानांना कधी होणार ?
जकार्ता (इंडोनेशिया) – येथील अन्न आणि औषध प्राधिकरणाने चीनचे आस्थापन ‘सायनोवॅक बायोटेक लिमिटेड’ने बनवलेल्या कोरोनावरील ‘कोरोनावॅक’ लसीला आपत्कालीन स्थितीत वापर करण्याची अनुमती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच इंडोनिशयातील प्रमुख इस्लामी संघटना ‘इंडोनेशियन उलेमा कौन्सिल’ने म्हटले होते की, कोरोनावरील लस ‘हलाल’ आहे आणि मुसलमानांसाठी अनुकूल आहे. यानंतर याला अनुमती देण्यात आली. तत्पूर्वी या लसीमध्ये डुकराचा अंश असल्याचा दावा इस्लामी संघटनांकडून केला जात होता.