कोलंबिया येथील कारागृहात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू

येथील कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेनंतर २१ मार्च या दिवशी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला, तर ८३ जण घायाळ झाले.

पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ करू शकत नाही ! – इम्रान खान

पाक कोरोनाशी लढण्यास कुठल्याही पातळीवर सक्षम नाही आणि हे पाकिस्तानी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आतातरी पाकला आणि त्यांच्या जिहाद्यांना त्यांनी देशाची कोणती प्रगती केली, हे लक्षात आले असेल, अशीही अपेक्षा करता येणार नाही !

अमेरिकेत कोरोनामुळे २४ घंट्यांत ११७ जणांचा मृत्यू

अमेरिकेमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील २४ घंट्यांमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा ४१९ झाला आहे.

भारताने कोरोना रोखण्यासाठी उचलेली कठोर पावले योग्यच ! – मायकल जे रेयान, संचालक, जागतिक आरोग्य संघटना

भारत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले कठोर असली, तरीही ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने चालू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकल जे रेयान यांनी कौतुक म्हणून केले आहे……

कोरोनामुळे संपूर्ण जग भयावह मंदीच्या खाईत लोटले जाईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

कोरोनामुळे संपूर्ण जगाला गंभीर आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. वर्ष २००८ मध्ये आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटानंतर वर्ष २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये ०.६ टक्के इतकी घसरण झाली होती;……….