रोम (इटली) मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सहस्रो पक्षांचा मृत्यू

वर्ष २०२१ च्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्ते मृत पक्षांमुळे भरून गेले आहेत. पक्षी मित्र संघटना याविषयी गप्प का आहेत ?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन

यंदाच्या वर्षी होणार्‍या गडकोट मोहिमेविषयी (विशाळगड ते पन्हाळगड २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१) पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक येथील दशावतार मठ येथे घेण्यात आली.

मुंबई येथे रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्‍या धर्मांधाला अटक

एका रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे  भ्रमणभाषमधून चोरून चित्रीकरण करणार्‍या समीर शेख या धर्मांधाला पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्री हनुमानाला दंडवत घालत वानराने घेतला अखेरचा श्वास !

गुंडेवाडी (जिल्हा सांगली) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील अद्भुत घटना !

पाश्चात्त्य विकृतीच्या विरोधात लढणाऱ्यांचा देशाप्रतीचा त्याग आठवून भारतीय संस्कृती जोपासा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेक्षाध्यक्ष, भाजप

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे राजकीय किंवा निवडणुकीचे सूत्र नसून तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी शिवसेनेने लावून धरावी.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण करायला माझे समर्थन आहे ! – खासदार संभाजीराजे छत्रपती  

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. औरंगाबादचे नाव पालटण्यासाठी माझे समर्थन आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा डी.लिट.ने सन्मान होणार

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

नाशिक येथील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एस्.टी.वर छत्रपती संभाजीनगरचे फलक लावून आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत आंदोलन केले.