घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याचे मिरज शासकीय रुग्णालयातून पलायन

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे.

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा संरक्षक पत्रा कोसळून दुचाकीस्वार घायाळ 

मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला.

दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली.

पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

‘फास्टॅग’ला १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना ‘फास्टॅग’ लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते.

सांगली-कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण : सायंकाळी कोल्हापुरात पाऊस

४ जानेवारीला सांगली-कोल्हापुरात ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी कोल्हापुरात जोरात पाऊस आला. ५ जानेवारीलाही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

कणकवली बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक

बाजारपेठेतील झेंडाचौक येथे ४ जानेवारीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ‘जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस’ अन् ‘रामचंद्र उचले किराणा आणि आयुर्वेदिक दुकान’ ही दोन दुकाने जळून खाक झाली.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा ७ जानेवारीला कणकवलीत ट्रॅक्टर मोर्चा

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ ७ जानेवारीला कणकवली शहरातील भाजप कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवा एस्.टी. महामंडळाकडून बंद

एस्.टी. महामंडळाला सातत्याने होत असलेल्या तोट्यामागे कुणाचे आर्थिक लागेबांधे आहेत का ?, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करून केवळ अडीच वर्षांत ही सेवा बंद करण्याची वेळ का आली ? याचे चिंतनही एस्.टी. महामंडळाने करावे.