सांगली, ४ जानेवारी (वार्ता.) – घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे. दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी केरामसिंग याला अटक केली आहे. अटकेनंतर तो कोरोनाबाधित असल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सकाळी स्नानगृहात जाण्यासाठी तो आत गेला आणि तेथील खिडकीतून पळून गेला. तो कोरोनाबाधित असल्याने खळबळ उडाली आहे.