असवली (सातारा) येथे ‘स्त्री सशक्तीकरण’ या विषयावर आयोजित व्याख्यान !
सातारा – आज देशात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांपासून रक्षण होण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे. स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर सक्षम होऊन स्वतःमधील शक्तीतत्त्व जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी केले. असवली, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘स्त्री सशक्तीकरण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी सौ. भक्ती डाफळे यांनी उपस्थित गणेशभक्त आणि धर्माभिमानी यांना मार्गदर्शन करतांना वरील आवाहन केले.
या वेळी असवली गावातील युवक, युवती, मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘असे मार्गदर्शन ही काळाची आवश्यकता आहे’, असे उपस्थितांनी सांगितले.