मराठी शाळेत शिक्षण घेतल्याने मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या १५९ तरुण-तरुणींचे आंदोलन

राज्यभर ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला; पण मराठीबहुल महाराष्ट्रात अशी घटना घडणे लज्जास्पद !

प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव हवे !

मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी फारसी भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द असणारा शब्दकोश सिद्ध केला. त्यांच्यामुळेच आपण हा दिवस पाहू शकत आहोत. आपणही शासकीय अवघड शब्द पालटून तेथे सोपे शब्द आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित ! – अधिष्ठाता डॉ. दीक्षित

सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सातारा नगरपालिकेच्या ३०७ कोटी ४७ लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला अनुमती

सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेद्वारे २ लाख ४२४ रुपये शिल्लक दाखवणार्‍या ३०७ कोटी ४७ लाख ४२४ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत अनुमती देण्यात आली.

सातारा आणि कराड यांच्या पथकरमुक्तीसाठी खासदारांनी निर्णय घ्यावा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?

सोने विक्रीप्रकरणी ८ परप्रांतीय संशयित पोलिसांच्या कह्यात !

कराड तालुक्यातील पेरले गावातील सीमेत सोने तस्करी करण्यासाठी आलेल्या ४ परप्रांतीय संशयितांनी २६ फेब्रुवारी या दिवशी पाटण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यास गंभीर घायाळ केले. या घटनेची तक्रार पोलीस कर्मचारी मुकेश संभाजी मोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवली.

कुटुंबाची अपकीर्ती थांबवा अन्यथा आत्महत्या करीन ! – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पूजाच्या वडिलांची प्रतिक्रिया

‘माझ्या कुटुंबाची अपकीर्ती होत आहे. ती लवकर थांबायला हवी, अन्यथा आत्महत्या करीन’, अशी चेतावणी पूजा चव्हाणच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे.

कोरोनाविषयक निर्बंधांचा निर्णय येत्या ८ दिवसांत घेणार ! – विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे स्पष्टीकरण

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता ही संख्या गेल्या वर्षी सप्टेंबर मासाच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस्.) या संस्थांनी केलेल्या कोरोनाच्या पहाणी अहवालात काढला आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला मराठी भाषा शिकवावी !

सध्या मी हिंदी भाषा शिकत आहे. यानिमित्ताने मला आदित्य ठाकरे यांनी मराठीही शिकवावी.

आरोपीला क्षमा होणार नाही ! – मुख्यमंत्री

एखाद्याला आयुष्यातून उठवायचा असाही तपास नको. ज्या क्षणी पूजा चव्हाण यांच्या संदर्भातील घटना कळली, त्या क्षणी निष्पक्षपणे तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांना कालबद्ध तपास करण्याचे आणि अहवाल देण्याचे आदेश दिले.