मालेगाव आणि संभाजीनगर येथे चोरी करणार्‍या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या जेरबंद

उच्चभ्रू दुकानांमधून महागड्या साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणार्‍या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी शीख संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

गेल्या २२ दिवसांपासून चालू असलेल्या देहलीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी संत बाबा राम सिंह यांनी सिंघू सीमेवर १६ डिसेंबर या दिवशी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत फाडली कृषी कायद्याची प्रत !

मुख्यमंत्रीपदावर असतांना भर विधानसभेत अशोभनीय आणि लोकशाहीविरोधी कृत्य करणारे केजरीवाल ! लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे वर्तन सुशिक्षित आणि सभ्य व्यक्ती कधीही करणार नाही, हे केजरीवाल यांना ठाऊक नाही का ?

सिंधमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमण  

पाकमधील असुरक्षित आणि असाहाय्य हिंदू ! त्यांच्याविषयी कुठलाही मानवाधिकार आयोग आवाज उठवत नाही आणि भारतातील हिंदूही मौन बाळगतात !

विवाहाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नाही ! – देहली उच्च न्यायालय

जर महिला दीर्घ काळापासून संबंधित व्यक्तीसमवेत सतत शारीरिक संबंध ठेवत असेल, तर विवाहाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच, असे नाही, असा निर्णय देत देहली उच्च न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप !  

पूज्यापाद संतश्री आसाराम बापू यांच्यावरही राजस्थानमधील कथित प्रकरणावरून देहली पोलिसांत तक्रार करून कारवाई करण्यात आली होती. त्यांना एक न्याय, तर हेमंत सोरेन यांना वेगळा न्याय का ?

उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव मुख्यमंत्र्यांना भेटणार

नाताळ आणि ख्रिस्त्यांचे नववर्ष या निमित्ताने राज्यात गोमांसाचा तुटवडा भासणार असल्याची चिंता गोमांस विक्रेते आणि गोमांस भक्षक यांना वाटत आहे.

डिंगणे येथील कोतवालाच्या आत्महत्येच्या प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

तालुक्यातील गावठणवाडी, डिंगणे येथील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी डिंगणे येथील नितीन श्रीधर सावंत आणि चंद्रकांत गणपत सावंत या दोघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिन साजरा !

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन आणि त्यांच्याशी  संलग्न ७४ संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक डोंगर शिखरांवर आरोहण आणि पर्वत पूजन आयोजित करण्यात आले होते.

मागील आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी

दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी दिली आहे.