देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत फाडली कृषी कायद्याची प्रत !

मुख्यमंत्रीपदावर असतांना भर विधानसभेत अशोभनीय आणि लोकशाहीविरोधी कृत्य करणारे केजरीवाल ! लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे वर्तन सुशिक्षित आणि सभ्य व्यक्ती कधीही करणार नाही, हे केजरीवाल यांना ठाऊक नाही का ?

नवी देहली – शेतकर्‍यांच्या आंदोलनात आतापर्यंत २० हून अधिक शेतकरी हुतात्मा झाले आहेत. आपल्या देशातील शेतकरी हा भगत सिंह यांच्याप्रमाणे कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. (कुणाला कोणती उपमा द्यायची हेही ठाऊक नसलेले केजरीवाल ! – संपादक) त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही अधिक वाईटपणा करू नये, अशी फुकाची टीका करत देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या कृषी कायद्याची प्रत भर विधानसभेत फाडली.

‘कोरोना काळात घाईघाईने हे ३ कायदे संमत करून घेण्याची काय आवश्यकता होती ? शेतकर्‍यांसाठी आणलेले हे कायदे काळे कायदे आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. देहली राज्यात हे कायदे लागू होणार नाहीत’, असेही केजरीवाल यांनी या वेळी घोषित केले.