शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी शीख संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नवी देहली – गेल्या २२ दिवसांपासून चालू असलेल्या देहलीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी संत बाबा राम सिंह यांनी सिंघू सीमेवर १६ डिसेंबर या दिवशी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली.

ते ६५ वर्षांचे होते. त्यांनी मृत्यूपूर्वी पत्रही लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘सरकार शेतकर्‍यांवर अन्याय करत आहे’, असे म्हटले आहे. हरियाणा आणि पंजाब यांसह विदेशातही त्यांचे अनुयायी आहेत. त्यांनी अनेक शीख संघटनांची महत्त्वाची पदे भूषवली होती.