गेल्या २ वर्षांत २ सहस्र रुपयांची एकही नोट छापलेली नाही ! – केंद्र सरकार

बाजारातून २ सहस्र रुपयांच्या नोटा अल्प होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेमध्ये बुरखा बंदीवरून पाकचा संताप

पाकने स्वतःची जगात काय प्रतिमा काय आहे, याचा विचार करावा !

ईश्‍वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही ! – व्हॅटिकन चर्च  

असे विधान हिंदूंच्या शंकराचार्यांनी केले असते, तर सर्व निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी त्यांना ‘सनातनी’ म्हणत हेटाळणी केली असती; मात्र व्हॅटिकन चर्चने समलैंगिक विवाहाला विरोध केल्यावर सर्वच जण मौन बाळगून आहेत !

केंद्र सरकारने मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल मिळवला !

इंधन दरवाढीमुळे जनतेमध्ये संताप असतांना सरकार अशा प्रकारचे महसूल गोळा करत असेल, तर हा जनतेवर केलेला अन्याय नव्हे का ?  

आयुर्वेद वैद्यांना शस्त्रकर्म करण्याच्या अनुमतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस  

पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यांना ३९ सामान्य शस्त्रकर्म, तसेच डोळे, कान, नाक आणि गळा यांच्या संदर्भातील १९ शस्त्रकर्म करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोटा (राजस्थान) येथे १५ वर्षांच्या मुलीवर १८ जणांकडून ९ दिवस बलात्कार !

पीडितेच्या भावाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला हाकलून लावले होते,

देहलीतील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा !

वर्ष २००८ च्या प्रकरणातील आतंकवाद्यांच्या संदर्भातील खटल्याचा निकाल १३ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे अन्याय ! आतंकवाद निपटण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये तात्काळ न्याय मिळणे जनतेला अपेक्षित आहे !

नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरात अज्ञातांनी चटया जाळल्या !

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशात असे प्रकार घडत असतांना ते रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांची १६ मार्चला मुंबईत बैठक

विधानसभेच्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १६ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित केली आहे.

समुद्रकिनारपट्टीतील अमली पदार्थ व्यवहार आणि ‘रेव्ह’ पार्ट्या रोखणे यांत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ! – विनोद पालयेकर, आमदार, गोवा फॉरवर्ड

‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते.