केंद्र सरकारने मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल मिळवला !

इंधन दरवाढीमुळे जनतेमध्ये संताप असतांना सरकार अशा प्रकारचे महसूल गोळा करत असेल, तर हा जनतेवर केलेला अन्याय नव्हे का ?  

नवी देहली – देशातील पेट्रोल आणि डिझेल यांचे मूल्य प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट असतांना अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्र सरकारला मोठे उत्पन्न मिळत असल्याची माहिती स्वतः सरकारनेच दिली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर प्रति लिटर डिझेल मागे ३२ रुपये सरकारला मिळत आहेत. ही आकडेवारी अबकारी कर, उपकर आणि अधिभार या तिन्ही गोष्टी मिळून आहे. वर्ष २०२० च्या मार्च आणि एप्रिल मासातील दरांशी तुलना केल्यास या कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे २३ रुपये, तर डिझेलमागे १९ रुपये महसूल म्हणून मिळायचे.