कुडाळ – विधानसभेच्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १६ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित केली आहे. कोरोनाविषयी शासनाने घालून दिलेले नियम पाळून ही बैठक होणार आहे.
या बैठकीत मतदारसंघातील अडचणी सोडवणे, गावातील विकासकामे मार्गी लावणे आदींविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला मुंबईत वास्तव्यास असलेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित रहावे. विकासकामे असतील, तर त्यासंदर्भातील पत्रव्यवहार किंवा निवेदने सोबत आणावीत. यासाठी आमदार वैभव नाईक यांचे स्वीय साहाय्यक पंढरीनाथ तावडे (संपर्क क्रमांक – ९३२२९०९२७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.