
कोटा (राजस्थान) – येथील एका १५ वर्षांच्या मुलीवर झालावाड येथे नेऊन ९ दिवस १८ पेक्षा अधिक जणांनी अनेक वेळा सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचाराच्या वेळी त्रास होत असतांना या मुलीला नशा येईल असे पदार्थ दिले जात होते. ते घेण्यास नकार दिल्यावर तिला मारहाण केली जात होती, अशी माहिती तिने दिली आहे. या प्रकरणी ४ अल्पवयीन मुलांसह २० जणांना अटक करण्यात आली आहे.
Rape, torture and police apathy: Rajasthan’s Jhalawar rape case where over a dozen men raped a minor girl for eight dayshttps://t.co/uuiKitZzDH
— OpIndia.com (@OpIndia_com) March 16, 2021
२५ फेब्रुवारी या दिवशी या मुलीच्या ओळखीची एक मुलगी आणि तिचा साथीदार तिला बॅग घेण्याच्या बहाण्याने झालावाडा येथे घेऊन गेले. तेथे या दोघांनी या मुलीला काही जणांच्या कह्यात दिले. त्यांनी तिला घर, हॉटेल, बांधकाम चालू असलेले घर आणि शेत येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ५ मार्च या दिवशी परत नेऊन सोडले. पीडितेने आईसमवेत जाऊन पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांकडून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेण्यास नकारअशा पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना नोकरीतून बडतर्फ करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! जर पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध घेतला असता, तर मुलगी आधीच सापडली असती ! या काळात पीडितेच्या भावाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला हाकलून लावले होते, असा आरोप त्याने केला. |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court