आयुर्वेद वैद्यांना शस्त्रकर्म करण्याच्या अनुमतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस  

नवी देहली – आयुर्वेदाच्या पदव्युत्तर वैद्यांना शस्त्रकर्म करण्याची अनुमती देण्यात आल्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय.एम्.ए.ने) सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने आयुष मंत्रालय, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोग यांना यावर नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. आय.एम्.ए.ने शस्त्रकर्म करण्याची अनुमती रहित करण्याची मागणी केली आहे. पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यांना ३९ सामान्य शस्त्रकर्म, तसेच डोळे, कान, नाक आणि गळा यांच्या संदर्भातील १९ शस्त्रकर्म करण्यास मान्यता देण्यात आली आहे.