ईश्‍वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही ! – व्हॅटिकन चर्च  

असे विधान हिंदूंच्या शंकराचार्यांनी केले असते, तर सर्व निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी त्यांना ‘सनातनी’ म्हणत हेटाळणी केली असती; मात्र व्हॅटिकन चर्चने समलैंगिक विवाहाला विरोध केल्यावर सर्वच जण मौन बाळगून आहेत !

व्हॅटिकन सिटी – समलैंगिक व्यक्तींना योग्य वागणूक दिली गेली पाहिजे; मात्र अशा विवाहांना आशीर्वाद देता येणार नाही; कारण ईश्‍वराच्या सांगण्यानुसार विवाह म्हणजे एक महिला आणि पुरुष यांच्यामधील आयुष्यभरासाठी स्वखुशीने एकत्र येण्याची पद्धत आहे. त्यामुळेच ईश्‍वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही, असे व्हॅटिकन चर्चने स्पष्ट केले आहे.

‘कॅथोलिक चर्चशी संबंधित महिला पाद्री समलैंगिक विवाहांंमध्ये जाऊन जोडप्यांना आशीर्वाद देऊ शकतात का ?’ यासंदर्भातील प्रश्‍नाला व्हॅटिकनने उत्तर देतांना हे स्पष्ट केले. या संदर्भात २ पानांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याला पोप फ्रान्सिस यांची संमती असल्याचे चर्चने स्पष्ट केले आहे. ७ वेगवेगळ्या भाषांमध्ये ते भाषांतरित करण्यात आले आहे.