पितांबरी आस्थापनात महिला दिनाच्या निमित्ताने तेजस्विनी पुरस्कार प्रदान !

पितांबरी आस्थापनाच्या आर्ट डायरेक्टर सौ. शैलजा शेट्टी यांना प्रथम आणि इ-कॉमर्सच्या बिझनेस डेव्हलपमेंट पदाचे दायित्व सांभाळणार्‍या सौ. तनिशा खरोसे यांना द्वितीय क्रमांकाच्या ‘तेजस्विनी पुरस्कार २०२१’ने त्यांच्या आस्थापनात गौरवण्यात आले.

शिवसेनेचे वरुण सरदेसाई सचिन वाझे यांच्या संपर्कात होते ! – आमदार नीतेश राणे

वर्ष २०२० मध्ये झालेल्या आय्.पी.एल्.च्या सामन्यांच्या बेटिंगची सर्व ठिकाणे सचिन वाझे यांना ठाऊक होती. त्यांच्यावर धाड टाकू नये, यासाठी सचिन वाझे यांनी प्रत्येक बेटिंगवाल्याकडे १०० ते १५० कोटी रुपयांचे हप्ते मागितले होते.

सोलापूर येथे महिलादिनानिमित्त धर्मप्रेमी युवतींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

प्रत्येक युवतीने स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे

शरद पवार यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या अटकेवरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथे बाजार समितीवर शेतकर्‍यांचा मोर्चा

१० सहस्र रुपयांंपुढे हळदीची बोली काढावी, तसेच लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी वाई बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे केली. या वेळी ‘तातडीने व्यापार्‍यांची बैठक घेऊन हळदीचे लिलाव घेऊ’, असे आश्‍वासन पिसाळ यांनी शेतकर्‍यांना दिले.

सातारा येथे स्वच्छतेची ऐशीतैशी !

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्‍याचा ढीग लावण्यात आला आहे.

जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या गाडीच्या क्रमांकांच्या पाट्या केलेल्या दुकानातील सीसीटीव्ही चित्रण सचिन वाझे यांनी नेले ! – दुकानदाराची माहिती

या माहितीमुळे संबंधित प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सचिन वाझे यांसह अन्य ५ लोक दुकानात आले होते. त्यानंतर दुसर्‍यावेळीही काही जण आले होते;…

परभणी येथे संचारबंदीत किरकोळ वाहतूक चालू, तर व्यापार्‍यांचा कडकडीत बंद !

विवाह कार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही ३१ मार्चपर्यंत बंदी

आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण

वादग्रस्त पथकर नाका म्हणून ओळख असणार्‍या आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास अज्ञात टोळक्याने मारहाण केली आहे. या मारहाणीचे ध्वनिचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसारित झाले आहे.

नीतेश राणे यांच्या आरोपात तथ्य नाही, कायदेशीर नोटीस देणार ! – वरुण सरदेसाई, शिवसेना

‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत बेटिंगवाल्यांकडून हप्त्याचा वाटा मिळावा, यासाठी वरूण सरदेसाई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला होता. यावर वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिले.