उत्तरप्रदेशातील बुलंदशहरामध्ये दळणवळण बंदी असतांना मशिदीमध्ये नमाजपठण

डीबाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील अमर हमजा मशीद आणि सराय मशीद या दोन्ही ठिकाणी मुसलमान गुप्तपणे नमाजपठण करण्यास जात होते.

मालेगाव (जिल्हा नाशिक) येथे एम्.आय.एम्. आमदाराच्या समर्थकाकडून त्यांच्यासमोरच वैद्यकीय कर्मचार्‍यास मारहाण

येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली.

सोलापूर जिल्ह्यातील खासगी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जिल्ह्यात खासगी डॉक्टरांनी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक आहे, तसेच ‘अन्नधान्य आणि भाजीपाला यांचा साठा मुबलक असल्याने एकाच वेळी गर्दी करू नका’, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले….

सहारा (मुंबई) परिसरात साठा करून ठेवलेली मास्कची २०० खोकी पकडली

सहारा येथील एका गोदामामध्ये साठा करून ठेवण्यात आलेली मास्कची २०० खोकी पोलिसांनी पकडली आहेत. सहारा आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही एकत्रितपणे कारवाई केली…..

गुंडेवाडी (जिल्हा जालना) येथे  ३ जणांच्या हातांवर ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यावर कुटुंबियांकडून आरडाओरड

तालुक्यातील गुंडेवाडी येथे २४ मार्च या दिवशी ३ कोरोना संशयित आले होते. त्यांच्या हातांवर मारण्यात आलेले ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यानंतर संबंधितांच्या घरातील लोकांनी आरडाओरड चालू केली….

केरळमध्ये चहा वेळेत न दिल्याने कोरोनाबाधिताकडून परिचारिकेला मारहाण

कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे.

गोवंशियांची हत्या करणार्‍या टोळीला पोलीस कधी पकडणार ? – भाजपचे आमदार आशिष शेलार

आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई येथे गोवंशियांची हत्या केल्यानंतर आरोपींना नावापुरते पकडले जाते. जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. गोवंशियांची हत्या करणार्‍या टोळीला पोलीस कधी पकडणार ? …           

१४ एप्रिलपर्यंत बंदीची मुदत संपेलच, असे नाही ! – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना कोरोनाविषयी किती गंभीर राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे !

२८ मार्चपर्यंत उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

२६ ते २८ मार्च या कालावधीत उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांच्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे…….