शरजील उस्मानीचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला !

अलिगड मुस्लिम विद्यापिठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने येथे ३० जानेवारी २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत ‘हिंदु समाज सडलेला आहे’, असे वक्तव्य केले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन !

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले. देहली येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना १७ मार्च या दिवशी पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

जळगावच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील !

शिवसेनेने ही लढाई ४५ विरुद्ध ३० अशा फरकाने जिंकली. भाजपला अतिशय भक्कम बहुमत असतांनाही त्यांच्या हातून सत्ता गेली आहे.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात कोणीही दिशाभूल करू नये !- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विरोधकांना सल्ला

१५ वर्षे मी पुणे-नाशिक सेमी ‘हायस्पीड’ रेल्वे प्रकल्प मंजूर होण्यासाठी अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. चाकण येथे शिवसेनेच्या वतीने विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.

वारकर्‍यांना धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुमती द्या !

नियम आणि अटी घालून वारकर्‍यांच्या धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन विश्‍व वारकरी सेनेच्या वतीने १७ मार्च या दिवशी तहसीलदार नीलेश मडके आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानोबा फड यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सिद्ध केलेल्या प्रश्‍नसंचात अभ्यासाबाहेरील प्रश्‍न !

परीक्षेची सिद्धता करतांना विद्यार्थ्यांना ताण येऊ नये म्हणून राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍नसंच सिद्ध करण्याचे दायित्व परिषदेला दिले होते; पण यातील प्रश्‍न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्याने परीक्षेसाठी नेमका अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे.

पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी चौघांना अटक

२५ लाख रुपये मूल्याच्या २ सहस्र रुपयांच्या चलनी नोटा दिल्यास, दुप्पट मूल्याच्या अर्थात् ५० लाख रुपये मूल्याच्या ५०० च्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून शिवणे येथील हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.

पंढरपूर – मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिल या दिवशी मतदान, तर २ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.

सातारा जिल्ह्यात बेरोजगारी आणि गरिबीतून ३ युवकांची आत्महत्या !

परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. आत्मबळ साधनेनेच निर्माण होते. धर्मशिक्षणामुळे साधनेचे महत्त्व मनावर बिंबते. शासनाने आता तरी शालेय शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करावा, ही अपेक्षा आहे.

संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवासाठी २९ मार्चला देहू (जिल्हा पुणे) येथे उपस्थित रहावे !

कोरोनाच्या नावाखाली सरकार सर्रास तीर्थक्षेत्रांवरील यात्रा आणि सांप्रदायिक सप्ताह बंद करत आहे, हे अयोग्य !