गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून लहान मुले काय म्हणतील ? – सौ. सुप्रिया सुळे, खासदार, शरदचंद्र पवार गट

सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले आहेत. त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिण्यात आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे.

सिल्लोड येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या ७ गोवंशियांची पोलिसांनी केली सुटका !

२१ सप्टेंबर या दिवशी शहरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ वाहनातून गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घाला ! – स्वामी भक्तांची मागणी

हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे.

ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून सन्मान !

या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.

निधी नसतांना काढलेल्या निविदा रहित करा ! – दिगंबर जाधव, शिवसेना

अर्थमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला ५० कोटी रुपये देतो, अशी घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात निधीही आलेला नाही.

भोर (पुणे) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध आंदोलन !

२३ सप्टेंबरला शिवतीर्थ, भोर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन घेण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन कार्यासाठी आशीर्वाद घेतले. 

मराठा समाजाने कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी करणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असल्या, तरी त्या कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत. मागील वेळी आपण सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवून ठेवू शकलो होतो.

पारोळा (जिल्हा जळगाव) येथे परवाना नसणार्‍या अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी !

अशातच अपघात घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? पालक आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी याकडे लक्ष द्यायला हवे !

विलेपार्ले येथे अल्पवयीन मुलांना मारहाण 

दोन अल्पवयीन (१४ आणि १७ वर्षे) भावांना चोर समजून सूरज पटवा आणि अन्य ४ जण यांनी बेदम मारहाण केली. नायडू चाळ येथे पहाटे ३ वाजता ही मुले गेली होती.