जर्मनी युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देणार

संयुक्त राष्ट्र महासभेने एक प्रस्ताव संमत करून रशियन सैन्याला युक्रेनमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. दुसरीकडे जर्मनीने युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.

रशियाकडून युक्रेनच्या केंद्रीय रेल्वे स्थानकावर आक्रमण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘लढाई अजूनही चालू आहे’, असे म्हटले आहे.

आम्ही नाही, तर ‘नाटो’ आणि युक्रेन यांनी अणूयुद्धाची गोष्ट केली ! – रशियाची कोलांटीउडी

‘जोपर्यंत युद्धाचा आमचा उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहील’, अस सांगतांनाच लावरोेव्ह यांनी ‘युक्रेनशी कोणत्याही अटीविना चर्चा करण्यास रशिया सिद्ध आहे’, असेही म्हटले आहे.

युक्रेनमधून १७ सहस्र भारतीय बाहेर पडले !

खारकीव सोडा, वाहन मिळाले नाही, तर पायी निघा ! – युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतियांना आदेश

युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू

युद्धामध्ये रशियाचे ६ सहस्र सैनिक मारल्याचा आणि रशियन विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावत रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे, तर १ सहस्र ५९७ सैनिक घायाळ झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले. 

कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे.

युक्रेनवरील आक्रमण थांबवा !

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा चालू होण्यासाठी अशी विनंती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केली आहे.

तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे.

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत.

युक्रेनमधील रुग्णालयांत प्राणवायुचा (ऑक्सीजनचा) मोठा तुटवडा

या तुटवड्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून ‘जर युक्रेनमधील रुग्णालयांत त्वरित प्राणवायु उपलब्ध करून दिला नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो’, अशी भीती व्यक्त केली आहे.