पंतप्रधान मोदी यांनी निरपराध हिंदूंच्या शिरच्छेदाचा निषेध करावा ! – गीर्ट विल्डर्स, नेदरलँड्सचे खासदार

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुष्कळ आदर करतो; परंतु जर त्यांनी ‘निरपराध हिंदूंच्या शिरच्छेदाचा निषेध केला आणि नूपुर शर्मा यांचे समर्थन केले’, तर मी त्यांचा अधिक आदर करीन, असे ट्वीट नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’चे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘#HindusLivesMatter’ (हिंदूंचे जीव महत्त्वाचे आहेत) आणि ‘#IslamicTerrorismInIndia’ (भारतातील इस्लामी आतंकवाद) या ‘हॅशटॅग्ज’चाही उल्लेख केला आहे.

अन्य एका ट्वीटद्वारे विल्डर्स यांनी म्हटले की, नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या लोकांना धमकावण्यात येणे अस्वीकारार्ह आहे. आपण जगाला हे दाखवून द्यायला हवे की, लेखणी ही त्यांच्या कुर्‍हाडीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे.