झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले.